टीम मंगळवेढा टाईम्स ।
कारखानदारांच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा प्रांत कार्यालय येथे एक दिवशीय लाक्षणिक असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत ऊसाची एफ आर पी रक्कम देणे बंधनकारक आहे.
परंतु दुसरा गळीत हंगाम आला तरी ऊस उत्पादकांना एफ आर पी चे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाहीत श्री संत दामाजी कारखाना, युटोपियन शुगर या कारखान्याने एफ आर पी कायद्याचे उल्लंघन करत शेतकऱ्याचे ऊस बिलाचे पैसे दिलेले नाहीत.
या कारखान्यावर महाराष्ट्र शासनाने कारवाई करावी व थकित एफ आर पी चे बिले तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास भाग पाडावे.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने एफ आर पी चा तुकडे करण्याचा घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात आज ११ ते ५ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार असून
तरी स्वाभीमानी शेतकऱ्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज