टीम मंगळवेढा टाईम्स ।
घराचं, शेताचं इमानेइतबारे सेवा करणारा प्राणी म्हणजे कुत्रा. यात काही खोडकरही असतात. यामुळे मालकांवर आफत ओढावते. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यातील कुरुल येथे घडली.
कुत्र्यानं शेजाऱ्याची चप्पल पळवल्यानं शतकऱ्याने कुत्र्याला मारले. यावर विचारणा केली म्हणून त्याच्या मालकीनीलाही लाकडाने मारहाण केली. ही घटना रात्री ९:३० सुमारास कुरुल येथे घडली.
त्याचे असे झाले, कुरुल येथील अनिल पवार यांच्या घरी त्यांनी एक कुत्रे पाळलेले आहे. रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास त्याने शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घराबाहेर ठेवलेली चप्पल पळवून नेली.
चिडलेल्या शेजाऱ्यांनी या कुत्र्याला मारहाण केली. हे समजताच सुनीता अनिल पवार (वय- ४०) या विचारणा करण्यासाठी गेल्या. यावरुन शेजाऱ्याने लाकडाने सुनीता यांना मारहाण केल्यानं त्यांच्या डाव्या हाताला मुका मार लागला.
सोमवारी सकाळी कामती येथील सरकारी दवाखान्यात उपचार करुन त्यांच्या मुलीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.(स्रोत; लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज