टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार दि.21 च्या पहाटे घडला असून या प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पिडीत मुलीची आई व कुटुंबातील इतर सदस्य दि.20 रोजी जेवण करून रात्री 10.00 वा. घरात झोपले होते.
पहाटे 4.00 वा. फिर्यादीची डिलीव्हरी झालेल्या मुलीचे बाळ रडू लागल्याने सर्वजण जागे झाले. त्यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात होती.
बाळाला शांत करून पुन्हा सर्वजण झोपी गेले. यातील फिर्यादी सकाळी 6.00 वा. उठल्यानंतर 17 वर्षीय मुलगी झोपलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
कुटुंबातील सदस्यांनी घराच्या आजूबाजूस, गावात, नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून आली नसल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तीचे वर्णन -उंची 5 फुट,अंगाने सडपातळ,रंग निमगोरा,अंगात नेसणेस निळया रंगाची जीन पँट,निळया रंगाचा टॉप,शिक्षण 11 वी असून ती मराठी व हिंदी भाषा बोलते.
अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज