टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.
या निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरणाचा अंदाज येणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव, सोड्डी, बावची, पौट, पाठकळ, मारोळी, हाजापुर, शिरनांदगी, येड्राव, गोणेवाडी, खोमनाळ, फटेवाडी, रहाटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, मारापुर, गुंजेगांव व ढवळस या 18 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीपैकी 25 टक्केहून अधिक म्हणजे 18 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची हि लिटमस टेस्ट मानली जात आहे.
मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे गट, परिचारक गट, बबनराव आवताडे गट व भालके गट त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना गट हा सुद्धा मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तर यांच्यातच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
त्यातही गावपातळीवर गट तट तडजोडी करून परस्परविरोधी आघाड्या होऊनही निवडणूक होण्याची शक्यता आहे. तरीही एकूणात ग्रामीण भागातील जनतेचा राजकीय कल यातून स्पष्ट होणार आहे.
सध्या स्थानिक पातळीवर आवताडे गट व परिचारक गटात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याने भाजप म्हणून एकत्रित येणार का असा प्रश्न निर्माण झाल्याने गाव पातळीवर या समविचारी पॅनल करून निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नेमके कोणाच्या मागे जनमत उभा राहते यावर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अंदाज बांधले जाणार आहेत.
आजपासून निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार असून २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
१८ नोव्हेंबर, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत. दाखल अर्जाची छाननी, दि.५ डिसेंबर. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस ७ डिसेंबर आहे.
दि.१८ डिसेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान. मतमोजणी व निकाल २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहिर झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज