मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
घरगुती वादातून नवऱ्यानं बायकोची निर्घृण हत्या केली आहे. पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. नंतर मारहाणही केली. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापुरात घडली आहे.
या घटनेची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी करत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौराबाई नीलकंठ पाटील असे मृत महिलेचं नाव आहे. तर, नीलकंठ भीमराव पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. हे जोडपं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून, त्यांच्यातक क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.
‘तू शेतात न येणारी आज कशी आलीस’ असा जाब विचारत पतीनं पत्नीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली.
दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. तसेच मारहाणही केली. या मारहाणीत पीडित महिला रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
गौराबाई काही दिवस मुलाकडे राहत होत्या. गावाला जाणे येण्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच गौराबाई यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज