टीम मंगळवेढा टाईम्स।
तिर्थक्षेत्र माचणूर येथील महाशिवरात्री यात्रेत दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांनी रंगेहाथ पकडून लिंबाजी वैभव काळे, रिता लिंबाजी काळे, सारिका रमेश पवार,सुरेखा सचिन चव्हाण (सर्व रा.पांगरमल जि.अहमदनगर) या चौघांना गजाआड केले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कल्पना दत्तात्रय पाटील (रा.एम्पालयमेंट चौक सोलापूर) ह्या महाशिवरात्रीनिमित्त तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी कुटूंबासह आल्या होत्या.
दि.18 रोजी सायंकाळी 5 वाजता सिध्देश्वर मंदिरात दर्शनाकरिता जात असताना भाविकांची खूप गर्दी असल्याने फिर्यादी व त्यांचे पती,भाऊ असे दर्शनबारीने पुढे जात होते.
मंदिराच्या दरवाज्यातून सायंकाळी 5 वाजनेच्या दरम्यान जात होते. फिर्यादीच्या बाजूस गर्दीत तीन महिला व त्यांचे सोबत एक पुरुष एकदम फिर्यादीच्या जवळ येवून गर्दीत ढकलाढकली करीत होते.
यावेळी सदर महिलांनी व पुरुषांनी फिर्यादीच्या पाठीमागून खांद्यावरती हात ठेवून गळ्यातील मणीमंगळसुत्र कशाच्यातरी सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक फिर्यादीच्या लक्षात आले.
त्यावेळी फिर्यादीने गळ्याकडे पाहिले असता मणीमंगळसुत्राचा एक पदर त्यांनी कापल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पतीस व भावास आरडाओरडा करुन सांगितल्यावर तेथे उपस्थित पोलीस हवालदार महेश कोळी,
महिला पोलीस नाईक सुनिता चवरे व सोनाली सावंत आदींनी त्या चौघांना रंगेहाथ जागीच पकडले.
सदर पुरुष आरोपी लहान मुलांचा वापर करुन चोर्या करीत असल्याचे चौकशीत उघड झाले. या चौघा कटलारांना पकडल्यानंतर भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत आवटे, दयानंद हेंबाडे, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे, खंडाप्पा हत्ताळी आदींनी आरोपीस ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर केले.
आरोपी लिंबाजी काळे याला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलखोल केल्यावर अनेक गुन्हे नगर जिल्ह्यात केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
पाच दिवस चालणार्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी सराईत कटलारांना पोलीसांनी चाणाक्षपणे ताब्यात घेतल्यामुळे पुढील यात्रा कालावधीतील होणार्या चोर्या टळल्याने भाविकवर्गातून पोलीसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, झालेल्या चोऱ्यात गेलेला माल परत नागरिकांना मिळवून देण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज