mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चार वर्षाच्या चिमुरडीचा काकाने घेतला जीव; इस्टेटपायी झोपेतील पुतणीला ठार करून मृतदेह फेकला नदीत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 21, 2023
in क्राईम, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे.

ज्ञानदा यशोधन धावणे असे चार वर्षीय मृत चिमुकलीचं नाव असून आरोपी काका यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोहोळ तालुक्यातील डिकसळ इथला रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर जमीन ही आईच्या नावे आहे.

फिर्यादी यशोधन धावणे यांनी दिलेल्या जबाबानुसार आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करुन द्यावी यासाठी आरोपी यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता. गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.

याच कारणावरुन सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले.

आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती-पत्नी जबाबदार असून आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली. गावातील लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

त्यानंतर चिमुकल्या ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाही.

त्यामुळे त्यांनी वडील शिवाजी यांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो असून ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचं सांगितलं. मात्र ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीपने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितलं.

यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिलं असं सांगितलं.

यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. तिथे नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढले. ज्ञानदाला उपचारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.

मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे शेतीच्या वाटणीच्या वादातून अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या केल्याने सख्ख्या काकाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खून

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

दारात धान्य मागायला आली पट्ट्याने मार खाऊन गेली; मंगळवेढ्यातील घटना

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा