मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
घराकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला समोरुन कुत्रा आडवा आला आणि दुचाकी रोडवर पडून तरुणाचे दोन दात पडून त्याला जखमी व्हावे लागले.
रात्री १०:१५ च्या सुमारास पूर्व भागातील एमआयडीसी रोडवर ही घटना घडली. राकेश हणमंतू बुरला (वय- २७, रा. नवीन घरकूल, कुंभारी, सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. यातील जखमी तरुण दुचाकीवरुन आपल्या घराकडे निघाला होता.
पूर्व भागातील लक्ष्मीनारायण टाकी, एमआयडीसी रोडवर तो आला असता कुत्रा आडवा आला. यामुळे त्याचे दुचाकीवरील निंत्रण सुटले आणि रस्त्यावर पडला.
यामध्ये त्याचे दोन दात पडले. हातापायाला खरचटले. त्याचा मित्र श्रीकांत आदेली याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटननेची नोंद करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज