टीम मंगळवेढा टाईम्स ।
सत्ताधाऱ्यांनी कारखान्यात हिटलरपेक्षा पेक्षा मोठी हुकूमशाही केली. पैशाच्या जीवावर निवडणूका जिंकता येतात हे खुळ सत्ताधाऱ्यांचे आहे ते खूळ कायमचे काढून टाकण्यासाठी या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी केले आहे.
समविचारी गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गाव भेटी सभा घेण्यात आल्या यामध्ये ते बोलत होते.
यावेळी अॅड नंदकुमार पवार, दामोदर देशमुख,संजय कट्टे,शिवानंद पाटील, प्रकाश गायकवाड, औदुंबर वाडदेकर,शशिकांत बुगडे, भिवा दोलतोडे, तानाजी काकडे, बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार,आप्पासाहेब चोपडे,
तानाजी खरात,कल्याण रोकडे, दादा गरडे, अशोक चौडे, भारत पाटील, , दादा दोलतोडे, अशोक चौडे , शिवाजीराव नागणे,पांडुरंग भाकरे, कांतीलाल ताटे, दौलत माने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की,
दामाजी कारखान्याच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी गटाने दिलेल्या जाहीरनाम्यातील 19 आश्वासनाची पूर्तता न करता सभासदांची फसवणूक केली.
सत्ताधाऱ्यांनी शेतकरी हिताचे कोणता निर्णय घेतला त्याचा जाहीर खुलासा करावा. कारखान्यास उस घालवताना शेतकऱ्यांची जी हेळसांड झाली त्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले नाहीत, कामगारांच्या पगारी नाहीत कारखाना नफ्यात यायच्या ऐवजी तोट्यात गेला.
शेतकऱ्यांच्या घामातून आलेल्या उसाची खोटी रिकव्हरी दाखवून साखरेची काळ्या बाजारात विक्री करण्याचे पाप केले करत दक्षिण भागातील मतदारांनी पोटनिवडणुकीत कमी मते दिली म्हणून भोसे पाणीपुरवठा योजनाही बंद पडण्याचे पाप केले.
कामगारांचे कारखान्याकडील साडेतीन कोटी रुपये न दिल्याने कामगारांची पतसंस्था बंद पाडली यामुळे हजारो कामगार देशोधडीला लागले. १९ हजार ५०० सभासदांना नोटीसा देऊन वगळण्याचा डाव रचला. २५०० सभासदांना पटापट कमी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज