mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 10, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

टीम मंगळवेढा टाईम्स । देवानंद पासले

लवंगी, सलगर, मारोळी, भोसे आदी परिसरातील कोणत्याही ठिकाणी एखादी अडचण आली तर ती सुटण्याची हक्काचे ठिकाण म्हणजे भैरवनाथ शुगर येथील अनिल (दादा) सावंत हे नाव आहे, असा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा प्रशासन असो कोणाच्याही मदतीला तत्परतेने धाव घेणे हा अनिल दादा सावंत यांचा जणू स्वभावच आहे.

अंधाराच्या कुशीत आपल्या कर्तृत्वाने आशेचा दीप लावणारी कर्तृत्वान माणसे समाज कधी विसरत नाही. पण अशी कर्तृत्वान माणसं अगदी हाताच्या बोटावर मोजावीत इतकी मोजकीच असतात. त्यापैकी एक अग्रेसर नाव आहे ते अनिल (दादा) सावंत यांचे.

माढा तालुक्यातील सिना नदीच्या काठावर वसलेले वाकाव हे छोट गांव, या गावातील सांवत घराण्यातील सुपुत्रांनी आपल्या कामाचा ठसा साखर उद्योग, शैक्षणिक आणि सामाजिक कामात उमटवला आहे.

ग्रामपंचायती पासुन जिल्ह्याच्या राजकारणातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यस्तरावर त्यांच्या कर्तृत्वाचा कार्यकुशलतेचा दबदबा आहे.

पैकी मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील माळरानावर भैरवनाथ शुगरच्या माध्यमातुन आपल्या कार्यकुशलतेने साखरेची गोडी वाढवणारे अनिल (दादा) सावंत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म आजचे दिवशी म्हणजे 10 एप्रिल 1978 मध्ये वाकाव येथे झाला.

लवंगी येथील भैरवनाथ शुगर मध्ये या परिसरातील हजारो बेरोजगारांच्या  हाताला काम मिळवून देणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे अनिल दादा सावंत होय.

घरातच समाजकारणाचे आणि राजकारणाचे बाळकडु मिळाले आहे. कारण घरातच समाजकारणाचे, सहकार क्षेत्रातुन सामाजिक काम करणारी मंडळी होती.

इंजीनिअर असणा-या अनिल दादांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेला साजेशी जबाबदारी स्विकारुन भैरवनाथ शुगरची धुरा खांद्यावर घेतली. अनिल दादांचा स्वभाव तसा मनमिळाऊ असल्यामुळे  माणसं जोडण्याची कला त्यांच्या अंगी उपजतच होती. त्यांना सामाजिक कार्याची जाणीव होती.

तसेच कर्तृत्वाची जाण होती. तांत्रिक ज्ञान हे शिक्षणातुन मिळवता येते पण माणुसकी ही अंगी वृत्ती असावी लागते. ती सदैव समाजप्रती अस्था असणारी अस्था त्यांच्या घराण्याच्या रक्तातच आहे.

कोणत्याही व्यवसायात त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्व अनन्य साधारण असते. अनिल दादा हे उत्कृष्ठ व्यवस्थापक आहेत. समाजातील सर्वसामान्यांच्या काळजी पोटी त्यांनी कोरोना काळात भोसे, मारोळी, जंगलगी, नंदेश्वर, लवंगी, सलगर, मंगळवेढा पोलीस स्टेशन, भैरवनाथ शुगरचे कर्मचारी यांना मास्क व सँनिटायझरचे मोफत वाटप केले होते.

मारोळी, लवंगी येथे जि.प्र.शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या व गणवेश तसेच त्यांना पिण्याचे पाण्यासाठी  टाक्या बसवून दिल्या.

हाडाचे शेतकरी कुंटुंबातील असल्याने त्यांनी शेतकरी बांधवांना सहकार्याचा हात दिला. पंचक्रोशीतील शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. कारखान्याच्या माध्यमातून तळ्यातील काटेरी झाडे, गाळ जेसीबी मार्फत मोफत काढुन दिले.

वृक्षारोपण, रक्तदान शिबीर,मोफत सर्व रोग आरोग्य निदान शिबीर असे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. शिवजयंती, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी अशा प्रेरणादायी उपक्रमात अनिल दादा सावंत आघाडीवर असतात.

उन्हाळ्याचे चटके तिव्र होत असताना अनिल दादा सावंत मित्र मंडळामार्फत गावोगावी पाणपोई उभारण्याचे नियोजन केले जाते.

हुलजंती येथे 100 झाडांना ट्री गार्ड देवुन त्यांनी वृक्षसंवर्धनाचा आदर्श घालुन दिला आहे. पाणी हे जीवन म्हणतात. शुध्द पिण्याचे पाणी हा मानवाचा अधिकार आहे या जाणीवतेने अनिलदादांनी लवंगी व सलगर (बु) या गावातील नागरीकांना कारखान्यावरील आर.ओ.चे पाणी मोफत उपलब्ध करुन दिले आहे.

कामाचं नियोजन, संघटन, समन्वय साधण्याची कला त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात आहे, नव्हे तर त्यांना लाभलेली ती दैवी शक्तीच आहे.

सर्वत्र साखर कारखानादारी अडचणीत आली असताना अनेक दुर्घट प्रसगांना निडरपणे सामोरे जात असताना या क्षेत्रात त्यांनी आपला आदर्श उभा केला आहे.

अनिल दादा कारखान्याच्या माध्यमातुन पैसा उभा करणारे पट्टीतील कारखानदार नाहीत तर ज्या समाजात-परिसरात आपण राहतो त्या प्रती आपले काही देणे आहे. याचे भान त्यांना आहे.

अविधेने समाजाचे होणारे नुकसान काही शतकांपुर्वी कळवळीने महात्मा फुलेंनी सांगीतले होते. तोच धागा मनात ठेवुन त्यांनी जयवंत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षपद जिद्दीने स्विकारले आणि तेथे ही आपल्या अस्तित्वाची निशानी कायम केली.

गिरीरीज डेव्हलपर्स, सावंत विहार, सावंत रेसिडेन्सी, सावंत गार्डन, सावंत काँर्नर असे अनेक गृहनिर्माण प्रकल्प त्यांनी पुण्यासारख्या शहरात यशस्वीपणे उभारले. ज्याच्या माध्यमातुन सामान्य माणसाचे आपले घर उभारण्याचे स्वप्न त्यांच्या आवाक्यात आले.

अन्न, पाणी यानंतर डोक्यावर छप्परही माणसाची महत्वाची गरज असते. ती सावंत बंधुनी ओळखुन आपल्या सामाजीक जाणिवेली आणखी एक आयना दिला आहे.

जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातुन शेतक-यांना कर्जपुरवठा तसेच ऊसाचे बिल, कामगारांचे पगार या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

भैरवनाथ शुगर मार्फत रुग्नवाहिका उपलब्ध करुन देवुन कोरोना सारख्या महामारीच्या काळात त्यांनी सहदयतेचे दर्शन घडविले आहे. भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन त्यांनी मोठ्या दुरदृष्टीने केले होते.

जे का रंजले कांजले त्यांशी म्हणावे आपले या तुकोबांच्या विचाराने प्रेरीत अनिल सावंतानी पंढरपुरच्या पुरग्रस्ताना चादर वाटप केले. कोवीड योध्दा म्हणुन मिरवण्यापेक्षा कोवीड रुग्नाच्या सेवेतच त्यांनी इतिकर्तृव्यता मानली.

सामाजिक कामाइतकीच अनिल दादांना सांस्कृतिक उपक्रमाची आवड आहे, जाण आहे, रसिकता आहे. विविध गावच्या यात्रा, धार्मिक उत्सवांना ते जेवढ्या सढळ हातांनी मदत करतात तितक्याच सहजतेने कोणताही गाजावाजा न करता महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेच्या सर्व राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनाचा आर्थिक भार अनिलदादांनी उचलुन आपल्या रसिकतेचा प्रत्येय निर्लेपपणे दिला आहे.

अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. आपल्या कामानी ते समाजातील सर्व स्तरावर जोडले गेले आहेत. त्या सर्वांच्या वतीने त्यांना भरभरुन शुभेच्छा देताना अनिल दादांना आरोग्यसंपन्न दिर्घायुष्य लाभो हेच मागणे मागत आहे.

तुम्हीच दिले,आभाळाला पंख, आयुष्याला रंग, भावणांचा गंध. म्हणुनच एक शेवटचे मागणे, तुम्ही चालतात ती, गंधीत वाट झाली,वाढदिनी तुमच्या नवी पहाट व्हावी.

संकलन- श्री.कृष्णदेव नामदेव लोंढे, मुख्य शेती अधिकारी, भैरवनाथ शुगर, लवंगी 

7350152222  / 8411039377

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंतभैरवनाथ शुगरवाढदिवस

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेतील आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; नोंदणी-व्हेरिफिकेशनमध्ये चूक नको; ‘या’ तारखेपर्यंत शाळा नोंदणी करा पूर्ण…

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! बापाने विहिरीत ढकलून जुळ्या मुलांचा घेतला जीव; सोलापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना; पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

January 11, 2026
Next Post
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात दोन मोटर सायकलच्या टकरीत एकाचा मृत्यू; मोटर सायकलस्वाराविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणूक खर्च बँकेमार्फत बंधनकारक नाही; कोल्हापूर खंडपीठ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..