टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील तरस या प्राण्याची हत्या केल्याप्रकरणात वनविभागाने श्रीशैल शंकर जमखंडी (वय ३० रा. मारोळी,ता.मंगळवेढा) याची चौकशी सुरू आहे.
अन्य चंद्रकांत गुराप्पा हिंचगिरे, आमसिध्द संगप्पा लवंगी, मलकारी चंद्रकांत हिंचगिरे, शिवानंद हत्ताळी हे चार संशयित आरोपी फरार आहेत.
जमखंडी याला मंगळवेढा न्यायालयासमोर उभे केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी.बागुल यानी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मारोळी, जाडर बबलाद (जत) व महमदाबाद हुन्नूर या गावांच्या सीमेवर
वन्य प्राण्यांच्या सूची एकमधील तरस प्राण्याला वरील लोकांनी काठीने गंभीर जखमी करून त्याची हत्या केलीण प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यावर वनविभागाने जमखंडी याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पंढरपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली एस. वाघ, माळशिरसचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एम. कोकरे व पंढरपूर रेस्क्यू पथकाने घटनास्थळी माहिती घेतली.
वरील पाच संशयित आरोपींनी तरसाची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तपास सहाय्यक वनसंरक्षक बी. जी. हाके यांच्याकडे तपास आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज