टीम मंगळवेढा टाईम्स।
आमदार समाधान आवताडे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या भव्य अभ्यासिकेचे भूमिपूजन आणि नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ आज, गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गजानन पाटील सर यांनी दिली आहे.
आर.बी.सी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तांडोर-सिद्धपूर येथे हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे.

या अभ्यासिकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळणार असून, त्यांच्यासाठी हक्काचे अभ्यासाचे दालन उपलब्ध होणार आहे.

नगरसेवक सोमनाथ आवताडे यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भोसे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर हे असणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आणि सभापतींचा विशेष सत्कार (सत्कारमूर्ती) करण्यात येणार आहे.

सत्कारमूर्ती मान्यवर
या सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, पंचायत समिती सभापती सौ.दिपाली आनंद ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, सौ. संगिता दुधाल, सौ. जयश्री कवचळे, विनायक यादव, सौ.करुणा शिवशरण, आप्पासो निकम आणि सौ.मोहिनी गणपाटील या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बापुराव चौगुले, मार्केट कमिटी संचालक गंगाधर काकणकी व आर.बी.सी. स्कूल संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील (सर) यांनी केले आहे.

या महत्त्वपूर्ण विकासकामाच्या प्रारंभ प्रसंगी आणि लोकप्रतिनिधींच्या कौतुक सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










