mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘एक्झिट पोल’ फसतात! सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात? असेही होऊ शकते…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 22, 2024
in राज्य
मोठी बातमी! महाराष्ट्रात निवडणुकांच्या घोषणा कधी? इलेक्शन कमिशनमधून आली महत्त्वाची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

‘एक्झिट पोल’ने निकालाची शक्यता वर्तविलेली आहेच; पण असे पोल फसतात व वेगळेच चित्र समोर येते, हे हरियाणाच्या निकालासह अनेक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे निकालापर्यंत शक्य अशक्यतांचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरूच राहणार आहे.

एक शक्यता म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आठएक दिवसांच्या आतच स्थापन होईल. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद व अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल.

मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. फक्त राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. यावेळी मविआची सत्ता आली तर तिन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असतील.

मात्र, ते मिळेल एकाच पक्षाला, अन्य दोन पक्ष उपमुख्यमंत्रिपदासाठी अडून बसतील. संख्याबळ जास्त त्याला मुख्यमंत्रिपद असा तोडगा निघू शकतो

असेही होऊ शकते…

एक दुसरा विचार राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तो म्हणजे दोनपैकी ज्यांना बहुमत मिळेल त्यांचेच सरकार येईल की नाही? याला कारण आहे तो २०१९ चा अनुभव.

■ त्यावेळी भाजप-शिवसेनेने निर्भेळ बहुमत मिळविले होते. पण आधी फडणवीस-अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तो प्रयोग काही तासांतच फसला आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.

■ महाराष्ट्रासाठी ही नवीन बाब होती, तिच्या पुनरावृत्तीची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

महायुतीचे सरकार आले तर…

■ महायुतीचे सरकार आले तर सध्याचाच फॉर्म्युला म्हणजे एका पक्षाला मुख्यमंत्रिपद व अन्य दोन पक्षांना उपमुख्यमंत्रिपद हे सूत्र कायम असेल. मात्र, मुख्यमंत्रिपद हे संख्याबळाच्या आधारावर दिले जाण्याची शक्यता आहे.

■ मात्र, पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपद दिले गेले तर देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील, असे मानले जाते. फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळाले तर एकनाथ शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन कसे केले जाईल, हा प्रश्न असेल

राष्ट्रपती राजवट कधी? :

निकालात कोणालाही बहुमत मिळाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल. राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील.

मात्र, ते लगेच कोणता पक्ष समोर आला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. या काळात अनेक गतिमान हालचाली होतील. अपक्षांसह लहान पक्षांच्या आमदारांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न होतील.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाराष्ट्र सरकार

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ सरपंचाला शाळेत शिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याची दुर्देवी वेळ; आमदार साहेब येण्याच्या दिवशी शिक्षक पाठवून डोळे पुसण्याचा केला प्रयत्न

खळबळ! विधानसभा निवडणूक कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहिल्याने शिक्षकावर गुन्हा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा