टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून शहरात शाळेला आलेल्या एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी तीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.२१ रोजी सदर अल्पवयीन मुलीला तीच्या वडिलांनी सकाळी ७.०० वा . मोटर सायकलवरून मंगळवेढयातील एका शाळेत आणून सोडले होते.
सकाळी १०.३० वा.तीचे वडील शाळेतून नेण्यासाठी शाळेच्या गेटवर आले असता बराच वेळ होवूनही ती अल्पवयीन मुलगी गेटवर आली नाही.
सदर मुलीबाबत तीच्या मैत्रीणीकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही.
वडीलांनी शाळेच्या ग्राऊंडवर तसेच मंगळवेढा बसस्थानकावर व शहराच्या अन्य ठिकाणी शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने
अज्ञात व्यक्तीने रखवालीतून पळवून नेल्याची खात्री पटल्याने सदर अज्ञात इसमाविरूध्द वडीलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्या अपहरण झालेल्या मुलीचा पोलिस कसून शोध घेत आहेत .
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज