टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदी पात्रात असलेल्या वाळू पॉइंटवर चहा टपरीधारक ४० वर्षीय महिलेला तु मला खूप आवडतसे असे म्हणत तिचा हात पकडून
खाली पाडून विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विठ्ठल मळगे, बबलू राजपूत, वैभव पाटील (रा.तांडोर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील ४० वर्षीय फिर्यादी महिलेची तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रात वाळू च्या पॉईंटवर चहाची टपरी असून
या टपरीजवळ वरील आरोपीनी येऊन तुझ्याकडे माल आहे का? असे विचारले असता पिडीत फिर्यादीने कसला माल मी फक्त चहा बिस्किटे विकत आहे.
तुला माहीत नाही का कसला माल, तुम्हाला मस्ती आलीय असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत तुमच्याकडे बघतो असे म्हणत वरील आरोपींनी
पीडित महिलेचा हात धरून तू मला खूप आवडतेस म्हणत पाला मध्ये खाली पाडून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी उभा असलेला फिर्यादीचा मुलगा सोडण्यासाठी आला असता तुझे पाय मोडेन असे म्हणून ढकलून देऊन खाली पाडले व शिवीगाळ दमदाटी केल्याची दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास डीवायएसपी राजश्री पाटील या करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज