टीम मंगळवेढा टाईम्स ।
ढाब्यावरील साहित्य का घेऊन गेला असे विचारल्यावर त्याचा राग मनात धरून एका 38 वर्षे महिलेला घरात ओढत नेऊन
तिचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ज्ञानू धोंडीबा येडवे, दत्ता धोंडीबा येडवे, चंद्राबाई ज्ञानु येडवे (रा.निंबोणी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा पिडिता हिने दिनांक 16 रोजी दुपारी ३.३० वाजता आरोपी ज्ञानू येडवे यांच्या घरासमोर असताना
आमचे ढब्यावरील साहित्य का घेऊन गेले असे विचारल्यावर त्याचा राग मनात धरून मला तू कोण विचारणार
हे पारधे असे म्हणून शिवीगाऴ करून त्याच्या घरात ओढत नेत असताना छाती हात लावून ब्लाऊज फाडून शरीराशी झोंबा झोंबी करून
मनाला लज्जा वाटेल आसे कृत्य करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे दिलेले फिर्यादीमध्ये म्हटले आहे. घटनास्थळाला डीवायएसपी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी भेट दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज