टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे महिलेच्या पतीला शेजार्याकडून मारहाण होत असताना भांडणे सोडविण्यास गेलेल्या पत्नीचा विनयभंग करून तीच्या गळयातील 15 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने घेवून गेल्याप्रकरणी आरोपी भरत जोतीराम चव्हाण व शत्रुघ्न जोतीराम चव्हाण या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील पिडीत महिलेचा पती माचणूर गावाजवळ असलेल्या शेतजमीन गट नं.13 मध्ये दि.3 रोजी दुपारी 2.00 वा.
जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करीत असताना शेताशेजारी असणारे वरील दोघे आरोपी यांनी पिडीतेचे पती व दीर यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
पिडीत महिला भांडणे सोडविण्यास गेल्यावर दोघांनी तीला धरून शिवीगाळ करत मारहाण केली.
तसेच या दोघांनी तीला लज्जा वाटेल असे कृत्य करीत गळयातील सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून घेवून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस नाईक निंबाळकर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज