टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका 29 वर्षीय महिलेच्या घराचा दरवाजा रात्री 10.00 वा ठोठावल्यावर सदर महिला घराच्या बाहेर येताच,
तु मला खूप आवडतेस असे म्हणून साडीचा पदर ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी रावसाहेब निवृत्ती गरंडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तथा पिडीत महिला ही दि.12 रोजी रात्री 10.00 वा. घरात झोपली असताना आरोपी रावसाहेब गरंडे याने येवून घराचा दरवाजा वाजवला असता
फिर्यादीने कोण आले हे पाहण्यासाठी घराचा दरवाजा उघडून बाहेर आले असता ओळखीचा आरोपी दिसून आला.
यावर फिर्यादीने आरोपीस तु एवढया उशीरा माझे घरी का आलास असे विचारले असता त्याने फिर्यादीच्या जवळ येवून तु मला खूप आवडतेस असे म्हणून साडीचा पदर ओढून
पिडीतेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक विलास काळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज