टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी कृष्णदेव पंढरीनाथ आसबे (रा. तामदर्डी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी मुलीचे वडील हे कर्नाटक राज्यातील असून आरोपी कृष्णदेव आसबे यांच्या शेतात गेल्या आठ महिन्यापासून सालगडी म्हणून ते कामावर आहेत.
दि.६ रोजी रात्री ८ वाजता सर्वजण आरोपीच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घरी असताना पिडीत मुलगी बाथरूमला जाते असे सांगून दोन्ही बहिणी गेल्या होत्या.
दहा वर्षीय बहिणीने पिडीतेला आवाज दिला. मात्र ती आली नसल्याने तीने घरी आई वडीलांना सांगितले. यावेळी फिर्यादीने जावून पाहिले असता ऊसाच्या फडात तांब्या पडलेला दिसून आला.
यापुर्वी पिडीतेकडे एक मोबाईल मिळून आला होता. याबाबत फिर्यादीने विचारपूस केली असता तो आरोपी कृष्णदेव आसबे याने दिल्याचे सांगितल्यावर त्याला समजावून सांगून त्याचा मोबाईल परत केला होता.
घटनेच्या दिवशी फिर्यादीने आरोपीच्या घरी जावून पाहिले असता आरोपी घरी मिळून आला नाही. अज्ञात कारणावरून मुलीस पळवून नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज