टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (अजित पवार गट) रामेश्वर मासाळ यांच्यासह दोघांवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमिन खरेदी केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रकाश व्हरे (वय.65 रा.गोणेवाडी ता.मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली असून रामेश्वर मासाळ व भाऊसाहेब कोळेकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रकाश व्हरे यांची गोणेवाडी गावात 18 एकर जमीन असून सन 2015 साली मौजे वळसंग ता.जत येथील राहणारे मनिष धोंडीराम चव्हाण यांना फिर्यादीच्या मालकीची शेत जमीन गट नंबर 553/1 मधील 03 एकर विकली होती.
फिर्यादी व्हरे यांनी मनिष चव्हाण यांना 03 एकर जमीन विकल्या नंतर त्या शेत जमिनीत दुधाचे डेअरी प्रकल्पाचे बांधकाम चालु केले त्यावेळी सदर बांधकामाची भिंत, शेत जमिनी लगत असलेल्या फिर्यादीचा मुलगा नवनाथ याचे मालकीच्या शेत जमिन गट नं 553/2 मध्ये आल्याने, मी त्या बांधकामास हरकत घेतली.
त्यावेळी मनिष चव्हाण यांनी, फिर्यादीकडे गट नं 553/2 मधील बांधकामात येत असलेली, लगतची आणखी दोन एकर जमिन खरेदी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी फिर्यादी व्हरे यांनी नाही म्हणून सांगितले होते.
तरी देखील त्यांनी सन 2016 मध्ये फिर्यादीला ती जमीन द्या असे म्हणुन 10 लाख रुपये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नंदेश्वर येथील खात्यावर पाठवीले होते. परंतु ते पैसे फिर्यादी व्हरे यांनी त्यांना वेळोवेळी परत केले असे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
दि.16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वा. च्या सुमारास फिर्यादि व फिर्यादीचा मुलगा नवनाथ असे दोघेजन दुधडेअरी जवळ असलेल्या फिर्यादी व्हरे यांच्या मालकीच्या गोणेवाडी गावचे हद्दीतील शेत जमिन गट नं 553/2 या शैतात गेले होते.
त्यावेळी तेथे गोणेवाडी गावात राहणारे रामेश्वर जेजेराम मासाळ, भाऊसाहेब कोंडीबा कोळेकर असे फिर्यादीच्या जमिनीमध्ये आले होते.
त्यांनी मला, तुझी जमीन गट नंबर 553/2 मधील डेअरीच्या लगत असलेली 02 एकर जमीन ही रामेश्वर मासाळ याचे नावावर करुन दे असे म्हणाले.
त्यावेळी फिर्यादीने त्यांना, माझी जमिन तुम्हाला देत नाही असे म्हणाले असता त्यावर रामेश्वर मासाळ यांनी फिर्यादीला, तु तुझी जमीन माझे नावावर कर नाहीतर मी तुला व तुझ्या कुटुंबाला ठेवतच नाही, अशी धमकी फिर्यादीला देऊन शिविगाळी केली. त्यावेळी भाऊसाहेब कोळेकर यांनी फिर्यादीला बाजूला घेऊन तुम्ही कशाला फुकट मरता, ही जमीन रामेश्वर मासाळ यांच्या नावावर करून द्या, असे म्हणून फिर्यादीला भीती घातली.
त्यावेळी सदर ठिकाणी फिर्यादीच्या गावातील दीपक दत्तात्रय मासाळ, जगन्नाथ दत्तात्रय मासाळ हे तिथे हजर होते.
रामेश्वर जेजेराम मासाळ यांनी फिर्यादीला दिलेल्या धमकीमुळे आणि भाऊसाहेब कोंडीबा कोळेकर यांनी घातलेल्या भीतीमुळे फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा नवनाथ असे बाबासाहेब मासाळ यांच्या मोटारसायकलवर बसुन दुय्यम निबंधक कार्यालय मंगळवेढा येथे आलो आणि
फिर्यादीचा मुलगा नवनाथ याचे नावावर असलेली शेत जमिन गट नं 553/2 मधील दुध डेअरी लगतची दोन एकर जमिन रामेश्वर मासाळ यांना खुश खरेदी दिली आहे.
सदर जमिनीचे विक्री पोटी फिर्यादीला रामेश्वर मासाळ यांनी आर्थिक मोबदला दिलेला नाही. त्यानंतर भितीपोटी फिर्यादी, मुलगा नवनाथ, मुलगी अंजना आणि पत्नी मंगल असे घरातुन निघुन आळंदी जि. पुणे येथे गेले होतो असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज