टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागातून एका 15 वर्षीय मुलीस अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने फूस लावून
पळवून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील पिडीत मुलीचे वडील हे दि.27 रोजी गावात दुध घालण्यासाठी गेले होते.
रात्री 8.00 वा. पिडीत मुलीच्या आईने पतीस फोन करून सांगितले की,स्वयंपाक करीत असताना 15 वर्षीय मुलगी शौचास जाते असे सांगून गेली बराच वेळ होवूनही ती घरी परत आली नाही.
त्या मुलीचा सर्वत्र तीच्या मैत्रीण व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांत मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे.
तीचे वर्णन पुढील प्रमाणे -रंग सावळा,उंची 5 फुट,चेहरा उभट,अंगात नेसणेस चॉकलेटी टॉप व निळया रंगाची लेगीज पँट अशा वर्णनाची मुलगी
कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज