मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सांगोला-मंगळवेढा या एस.टी.बसमध्ये प्रवास करणार्या कॉलेज विदयार्थीनीच्या बॅगेतील 2500 रुपये प्रवासादरम्यान काढून घेतल्याप्रकरणी दिव्या पवार (रा.तहसील कार्यालय परिसर,मंगळवेढा) हिच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विदयार्थीनी प्रतिक्षा हरिश्चंद्र बर्गे (वय 21,रा.लक्ष्मी दहिवडी) व तीची मैत्रिण प्रतिक्षा रणदिवे ह्या सांगोला येथून कॉलेज करून लक्ष्मी दहिवडीकडे सांगोला-मंगळवेढा या बसने दि.29 रोजी 5.45 वा.येत असताना

प्रवासादरम्यान त्या दोघींच्या शाळेच्या बॅगेतील 2500 रुपये वरील आरोपींनी काढून चोरी केली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.

मंगळवेढा बसस्थानकावर प्रवाशांच्या पिशव्या चापचताना दोघे संशयीत पोलीसांच्या ताब्यात
मंगळवेढा बसस्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या पिशव्या चापचत असताना दोघे संशयीतरित्या मिळून आले असून त्यांच्यावर पोलीसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढा बसस्थानकावर दि.28 रोजी प्रवाशांची पडलेली गर्दी याचा फायदा घेवून प्रवाशांच्या पिशव्या चापचत असताना आकाश पात्रे (वय 30), सिता हतागळे (वय 39,रा.सेटलमेंट सोलापूर) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेवून

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याने भविष्यात त्यांचे हातून मालमत्तेविषयी दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीसांनी बी.एन.एस.एस. कलम 128 प्रमाणे कारवाई केली आहे.

मंगळवेढा बसस्थानकावर सातत्याने चोर्या घडत असल्याने प्रवाशी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि.28 रोजी दुपारी वरील दोघे प्रवाशांच्या पिशव्यात हात घालताना रंगेहात पकडले गेले.

यावेळी प्रवाशांनी पोलीसांना या घटनेची माहिती देताच पोलीस व्हॅन तात्काळ सायरन वाजवत बसस्थानकावर दाखल होवून दोघांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












