टीम मंगळवेढा टाईम्स ।
पैसे न दिल्याने एका खातेदाराने चक्क बँकेला कुलूप लावून गाव गाठले. त्यामुळे दोन तास बँकेत मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, कुलूप तोडून बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली.
याप्रकरणी तानाजी नामदेव दरेकर (वय ४५, रा. काटी सावरगांव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्याविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास
बँक ऑफ बडोदा, शाखा-वडाळा, ता. उ. सोलापूर येथे घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तानाजी दरेकर हे २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी साडेचार वाजता वडाळ्यातील बँक ऑफ बडोदा येथे आले.
त्यावेळी बँकेची आर्थिक व्यवहाराची वेळ संपली होती. त्यामुळे बँकेत जाण्यास कर्मचाऱ्याने तानाजी दरेकर यांना आर्थिक व्यवहाराची वेळ संपलेली आहे, तुम्ही बँकेच्या वेळेत या, असे म्हणाल्याने तानाजी दरेकर यांनी चिडून
बँकेच्याजवळ असलेल्या हार्डवेअरच्या दुकानातून नवीन कुलूप विकत घेऊन बँकेच्या दरवाजास बाहेरून कुलूप लावून निघून गेले.
याबाबत आदित्य गणपती अकेला (वय ३७, रा. सोलापूर) या बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, सरकारी कामात अडथळा करून बँकेच्या कर्मचाऱ्यास,
खातेदारास आत-बाहेर येण्यास मज्जाव करून दोन तास डांबून ठेवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल मोरे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज