टीम मंगळवेढा टाईम्स ।
दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी एका शेतकऱ्याला काही कळायच्या आत सोने सोडविण्याकरिता हँडलला अडकवलेली १ लाख ७० हजार रोकडने भरलेली पिशवी काढून घेऊन धूम ठोकली.
ही घटना दुपारी सांगोल्यात मुजावर गल्ली येथे घडली. दरम्यान यापूर्वी याच बँकेशेजारी खाजगी बँकेतून
शिक्षकाने काढलेली सुमारे अडीच लाखाची रोकड कारच्या बोनेटवर ऑइल पडल्याचे सांगून अनोळखी तरुणांनी लंपास केली होती.
या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच दुसरी घटना घडली. त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एखतपूर येथील शेतकरी अविनाश सिद्धेश्वर गायकवाड यांनी सांगोला येथील युनियन बँकेच्या शाखेतून मंगळवार, २६ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास सोने सोडविण्याकरिता बचत खात्यातील सुमारे १ लाख ७० हजार रुपये काढले.
ही रक्कम लाल रंगाच्या पिशवीत ठेवून दुचाकीच्या हॅन्डलला अडकवली. तेथून ते त्याच दुचाकीवरून मुजावर गल्ली येथील एका सराफाच्या दुकानी आले. दुचाकी स्टैंडला लावून खाली उतरत असताना चोरट्यानी पिशवी पळविली.
आरडाओरड केली पण ..
या पिशवीत रोख १ लाख ७० हजार रुपयेसह बँकेचे चेकबुक, पासबुक , आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, फोटो आदी कागदपत्रे असलेली पैशाची पिशवी नकळत काढून घेऊन दुचाकीवरून पळून जाऊ लागले. त्यावेळी अविनाश गायकवाड यांनी आरडाओरड केला मात्र चोरटे पळाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज