टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने खास बाब म्हणून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या मागणीनुसार 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले असल्याची माहिती कृष्णदेव लोंढे यांनी दिली आहे.
मागील आठवड्यामध्ये निंबोणी व परिसरातील शिष्टमंडळासहित अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन
याबद्दल पत्र देऊन पाठपुरावा करून पंधरा दिवसाच्या आतच निंबोणी येथे आरोग्य केंद्राची उभारणी करण्यास मान्यता घेतली व तेथील सेवक मान्यता ही घेतली आहे.
या कार्यामुळे भैरवनाथ शुगरचे व्हॉईस चेअरमन अनिल सावंत यांचा निंबोणी व पंचक्रोशी मध्ये अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
यापुढील काळातही मंगळवेढा तालुक्यातील विविध आरोग्य प्रश्नावर उपकेंद्राच्या बाबतीत अनिल सावंत हे पाठपुरावा करून विविध योजना आपल्या तालुक्यासाठी खेचून आणणार यात कोणती शंका नाही असे गौरवोद्गार या पंचक्रोशीतील सर्व नागरिक करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज