टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथून एक २९ वर्षीय युवक बेपत्ता झाला असल्याची खबर आप्पासो बहादूर शेख (वय ६४ रा.गणेशवाडी) यांनी मंगळवेढा पोलिसांत दिली आहे.
सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास कदीर आप्पासो शेख ( वय २९ रा.गणेशवाडी ) हा युवक बेपत्ता झाला आहे.

अंगाने सडपातळ, रंग, निमगोरा , उंची १६६ काळी चप्पल , शर्ट पँट परिधान केलेला हा युवक घरातून कोणास काही न सांगता (एम.एच.१३.एम ९३४६) ही मोटर सायकल घेवून निघून गेला आहे.
तो अदयापपर्यंत बेपत्ता आहे. त्याचा शोध घेतला असतो तो मिळून आला नाही, तो जरी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












