टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथून एका १७ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी भावाच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, रड्डे येथून दि .१३ रोजी सकाळी ११.०० वा. अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची फिर्याद तीच्या भावाने पोलिसात दिली आहे.
कुटुंबियांनी सर्वत्र तीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.तीचे वर्णन रंग काळा सावळा , नाक जाड , अंगाने मध्यम , कानात सोन्याच्या रिंगा , नाकात नथ अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
लहान भावानेच पळविले मोठ्या भावाच्या मुलीला
मागील भांडणाचा राग मनात धरून सावत्र भावाने मोठ्या भावाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना सोलापुरात घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्या सावत्र भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ती मुलगी सध्या मामाच्या घरी राहायला होती. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या भावाने मागील भांडणातून मुलीला मामाच्या घरातून पळवून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सुनेला घरात न घेतल्याने पतीसह सासरच्यांना मारहाण
सुनेला घरात न घेतल्याने पतीला व त्याच्या घरातील लोकांना विटा फेकून व हाताने मारहाण केल्याची घटना सागर चौक परिसरात घडली. या प्रकरणी इरफान मुर्तज शेरदी यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार उमर हारूण रशीद कोतवाल, मुजमिल भडकल, मुनेरा हसन रशीद कोतवाल आणि उस्मान मकबुल कोतवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, फिर्यादीच्या सुनेचे काका हे सुनेला घेऊन त्यांच्या सासरी आले. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने, तू कशाला आलीस, तुला जमातीचे लोक सोडणार होते, अशी विचारणा केली.
त्यानंतर सुनेने तिच्या काकास फोन करून हे लोक मला घरात घेत नाहीत, असे सांगितले. त्यावेळी त्या सर्वांनी मिळून फिर्यादीच्या मुलास मारहाण केली.
भांडण सोडवायला आलेल्या फिर्यादीच्या वडिलांना वीट लागली आणि डोक्यास जखम झाली. विटा मारून दरवाजा तोडला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज