टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथून एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी यांचे कुटुंबिय दि .१३ रोजी जेवण करून घरात झोपी गेले होते तर फिर्यादीचा मुलगा मंदिरात भजन ऐकायला गेला होता.
रात्री १.०० वा. तो घरी परतल्यानंतर अपहरणकर्ती मुलगी मोबाईल पहात बसली होती. यावर भावाने तीला मोबाईल बंद करून झोपायला सांगितले व ती झोपी गेली. तदनंतर पहाटेच्या दरम्यान ३.०० वा. सदर मुलास जाग आल्यावर ती मुलगी झोपलेल्या ठिकाणी दिसून आली नाही
कुटुंबातील सर्वानी तीचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
सदर मुलगी अंगाने सडपातळ, रंग गोरा , चेहरा गोल, नाक सरळ, उंची ५ फुट , केस काळे व लांब , अंगात पांढरा टॉप व काळी पँट अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या दृष्टीस आल्यास त्यांनी पोलिसांशी ०२१८८/२२०३३३ वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज