मंगळवेढा टाईम्स न्युज।
मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षाच्या मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रविवारी (दि. १) सायंकाळी सातच्या सुमारास पेनूर (ता. मोहोळ) येथे ही घटना घडली. यशराज धर्मराज डोके असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंबीयांसह राहतात. शेती करून उपजीविका करतात. दि. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाइल वापरण्यास का दिला नाही?

म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला. तो घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉडने कडी तोडली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

यशराजला तत्काळ पेनूर येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलिस नाळे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














