mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धनगर समाजाच्या भावनेशी खेळू नका अन्यथा मातोश्रीवर आंदोलन आ.गोपीचंद पडळकरांचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
धनगर समाजाच्या भावनेशी खेळू नका अन्यथा मातोश्रीवर आंदोलन आ.गोपीचंद पडळकरांचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । धनगर समाज आरक्षणासाठी राज्यभरात, गावागावांत, तालुक्यांत, जिल्ह्यांमध्ये आंदोलन करीत आहे. याचा जर राज्य सरकारने विचार नाही केला, धनगरांच्या भावनेशी खेळला तर येथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आम्ही आंदोलन करू, ‘मातोश्री’वर आंदोलन करू, असा इशारा आ. गोपीचंद पडळकर यांनी दिला.

धनगर समाजाला आरक्षण देऊन त्यांना एस.टी.चा दाखला देण्यात यावा. त्याचबरोबर ज्या योजना आदिवासींना त्याच योजना धनगरांना द्या, अशी मागणी करीत झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे चंद्रभागेच्या महाव्दार घाटावर ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पक्ष, गट-तट विसरुन हजारोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.

पुढे बोलताना आ. पडळकर म्हणाले की, सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांची दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा. अन्यथा राज्यातील मंत्री, सत्ताधारी आमदारांच्या घरांसमोर जाऊन आंदोलन करु. 

मी स्वत: ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन ढोल वाजवणार आहे. सगळ्या नेत्यांना जागे करेन. हे धनगर समाजाचे आंदोलन आहे.

याला कोणाचेही नेतृत्व नाही. मी या आंदोलनात कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो आहे. धनगर समाजाच्या हितासाठी जे जे काही करता येईल ते ते आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल.

त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घ्यावी. त्यामुळे राज्य सरकाने अध्यादेश काढून राज्यात ‘धनगड’ ही जमात अस्तित्वात नाही, ‘धनगर’ हीच जमात आहे.

या धनगर समाजाचे आरक्षण राज्य सरकारने अध्यादेश काढून चालू करावे व केंद्र सरकारला सांगावे की, आम्ही धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी केलेली आहे. त्यांची जनगणना करुन त्यांची जी टक्केवारी आहे ती सांगून त्यानुसार आरक्षण द्यावे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात धनगर आरक्षणाबाबत धनगर समाजातील मंत्री, आमदार यांची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यादेश काढायला सांगितला होता. काही अडचणी येत असतील तर काय करावे हे सांगा, असे म्हटले होते.

त्यावेळी कोर्टात प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हिट) दाखल केले. आमची कोर्टात केस चालू आहे. त्यामुळे आम्ही 70 टक्के लढाई जिंकलेली आहे. राहिलेल्या 30 टक्क्यांसाठी आम्ही लढाई लढत आहोत. आता आम्हाला राजकारण करायचे नाही.

आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करणे, एसटीचा दाखला मिळवणे हे महत्त्वाचे आहे. धनगर समाजाला आजपर्यंत आरक्षणापासून कोणी दूर ठेवले आहे हे योग्यवेळी सांगेन, असे आ. पडळकर म्हणाले.

या आंदोलनात धनगर समाजाचे नेते माऊली हळणवर, प्रा. सुभाष मस्के, पं.स. सदस्य दादा मोटे, रमेश हाके आदींसह हजारो समाजबांधव उपस्थित होते.

Don’t play with the sentiments of Dhangar Samaj, otherwise the agitation on Matoshri is a warning from MLA Gopichand Padalkar

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

नेत्यांनो..! महायुती की स्वबळावर? निवडणूक लढवायची निर्णय घेण्याचे अधिकार ‘यांना’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिकार

October 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष  खुला महिला प्रवर्गासाठी राखीव; अनेकांचा हिरमोड; आता उमेदवार निश्चितीसाठी वेग येणार

October 6, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

महायुतीमध्ये पहिली ठिणगी! झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाही; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

October 5, 2025
ठाकरे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

मोठी बातमी! बाळासाहेबांचं आधीच निधन, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले, ‘या’ जेष्ठ नेत्याने केला उद्धव ठाकरेंवर टोकाचा आरोप

October 3, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ‘या’ तारखेला आरक्षण सोडत; ‘या’ नियमावलीनुसार होणारी ही पहिली निवडणूक; असा आहे सोडतीचा कार्यक्रम

October 2, 2025
Next Post
सावधान! फेसबुकवरील चॅलेंज ट्रेंडला बळी पडू नका अन्यथा होईल नुकसान; सोलापूर पोलिसांचे आवाहन

सावधान! फेसबुकवरील चॅलेंज ट्रेंडला बळी पडू नका अन्यथा होईल नुकसान; सोलापूर पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

कामाची बातमी! …तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

October 15, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

राजकीय कार्यकर्त्यांनो! निवडणूक न लढवताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य बनता येणार? ‘इतक्या’ कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..