मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दारू पिण्यासाठी पतीने पैसे न दिल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे.मंगळवारी मध्यरात्री पंढरपुरातील तुंगत या ठिकाणी विजया अशोक पवार (वय वर्ष 45)असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तुंगत येथील पवार यांच्या घरी मंगळवारी 18 मार्च रोजी जेवण्यासाठी मटण आणले होते.अशोक पवार हा व्यसनी असल्याने मटन खाण्यापूर्वी दारू पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी पत्नी विजया पवार यांच्याकडे केली होती.
पत्नी विजया पवार यांनी दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती अशोक पवार (वय वर्ष 50) यांनी पत्नी विजया यांच्या मानेवर कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे.
सदर घटना तुंगत येथील अशोक पवार यांच्या शेतात राहत्या घरी झाली आहे. विजया पवार यांच्या पश्चात दोन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज