टीम मंगळवेढा टाईम्स । नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून लेखणी बंद आंदोलनास सुरवात होणार असल्याने आज पासून दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम बेमुदत बंद राहणार आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी यांनी त्यांच्या विविध मागण्या वेळोवेळी शासनाकडे मांडल्या ,मात्र शासनाकडून यांची दखल घेतली जात नसल्याने यांनी आज गुरुवार (दि. १) पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले असल्याची माहिती दुय्यम निबंधक शंकरराव सांगळे यांनी दिली
अशा आहेत मागण्या
रखडलेल्या पदोन्नती तत्काळ कराव्यात ,रिक्त पदेत्वरित भरावीत,कोरोनामुळे मयत झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करावी.अधिकारी कर्मचार्यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे,
तुकडे बंदी व रेरा कायध्यान्वे झालेल्या कारवाया मागे घ्याव्यात,आयकर विवरण पत्र , पोलीस विभाग व उत्तर विभागाकडून मागणी केल्या जाणारी माहिती केंद्रीय सव्हर वरून पुरविण्यात यावी, निनावी तक्रारी बाबत कारवाई करू नये, इत्यादी अनेक मागण्या केल्या आहेत.
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
लॉकडाऊन च्या काळात खरेदी विक्री व्यवहाराना प्रोत्साहन देण्यासाठी स्टम्प ड्युटी कमी करण्यात आली होती तसेच लॉकडाऊन मध्ये रखडलेले व्यवहार आता पूर्ण होत असताना पुन्हा बंद पुकारल्याने शासनाच्या महसुलात घट होण्याची शक्यता आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी यांनी त्यांच्या विविध मागण्या वेळोवेळी शासनाकडे मांडल्या ,मात्र शासनाकडून यांची दखल घेतली जात नसल्याने आज गुरुवार (दि. १) पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.-शंकरराव सांगळे दुय्यम निबंधक मंगळवेढा
कोरोनामुळे वकील, झेरॉक्स व इतर छोट्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे आणि आता दस्त नोंदणी सुरू झाल्याने थोडा आधार निर्माण झाला होता मात्र बंद पुकारण्याने पुन्हा उपासमारीची वेळ येईल तसेच शासनाचा महसूल बुडणार आहे आणि नागरिकांचे देखील गैरसोय होणार आहे यामुळे शासनाने यातून मार्ग काढून दुय्यम निबंधक कार्यालये पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
Solapur district Movement to stop writing in the office of the Deputy Registrar
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज