मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा कोरडा गेल्यामुळं बहुतांश भागात शेतकऱ्यांची पिकं करपली आहेत. पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळं सरकारनं राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. अशातच एका बाजूला उन्हाचा तिव्रता वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला पोऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने उभी भातशेती आडवी झाली आहे. अनेक ठिकाणी कापलेली भातशेती भिजून गेली आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.

हवामान बदलामुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणाली सक्रिय होत असल्याने पुढील दोन आठवड्यांत देशातील अनेक भागांत, विशेषतः दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

या संभाव्य हवामान बदलामुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह कोल्हापूर आणि घाटामाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. साताऱ्यातही पावसाचा अंदाज आहे.

तर पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील, असा हवामान खात्याने सांगितलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट असून वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात कोरडे हवामान असणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहणार असल्याने लोकांनी घराबाहेर पडताना छत्री आणि पाणी जवळ ठेवावे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












