सोलापूर : प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक आजही पक्षासोबत भक्कमपणे उभा आहे. आमचा एकही खरा शिवसैनिक कुठेही गेलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला कुठलाही धक्का बसलेला नाही.

उलट, तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिक आता अधिक ताकदीने व जोमाने कामाला लागले आहेत,” असे मत युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांनी मांडले आहे.

युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेला खिंडार पडल्याचा जो खोटा प्रचार केला जात आहे, त्याचा त्यांनी जोरदार समाचार घेतला.

उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील सद्य राजकीय परिस्थिती आणि घडामोडींची सविस्तर माहिती देण्यासाठी शिवसेनेचे एक प्रमुख शिष्टमंडळ उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान तालुक्यातील सर्व घटनाक्रम त्यांच्या कानावर घातला जाईल, अशी माहितीही निकम यांनी दिली.

”पक्षाशी निष्ठा असलेल्यांना जनतेने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ओळखले आहे. आगामी काळात मंगळवेढ्यात शिवसेना पक्षसंघटना आणखी मजबूत करून पक्षाचा भगवा अधिक ताकदीने फडकवू,” असा ठाम विश्वास बाळासाहेब निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










