मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचे शुल्क माफ करण्याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिले आहेत. त्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळांना लेखी पत्र जारी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या फेब्रुवारी व मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाते.

मात्र, दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच शिक्षण मंडळाच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्याना व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

तसेच, या निर्णयामुळे कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षा शुल्काअभावी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबंधित शाळांना देण्यात आले आहेत.
शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना
पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्णयानुसार शुल्कमाफीचा लाभमिळवून देण्यासाठी शाळांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच परीक्षा शुल्क न आकारता विद्यार्थ्याकडून आवेदनपत्रे भरून घ्यावीत अशा सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














