मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा शहरातील शासकीय जागा, मुख्य रस्ते तसेच पथरस्त्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संबंधित अतिक्रमणे पंधरा दिवसांच्या आत पूर्णपणे हटवून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटीस बजावूनही अतिक्रमण हटविण्यात आले नसल्यास नगरपालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हटविण्याच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान कोणी अडथळा आणल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात कायदेशीर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंगळवेढ्यासह पंढरपूर, अक्कलकोट तसेच जिल्ह्यातील विविध शहरांमधील शासकीय जागा व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

या चौकात होणार कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे मंगळवेढा शहरातील संत दामाजी चौक, एसटी स्टैंड परिसर, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक आणि शहीद किसन माने चौक, पंढरपूर रोड, एमएसईबी रोड, बोराळे नाका, सांगोला नाका यासह या गर्दीच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

या चौकांमध्ये अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.

आता प्रशासन या आदेशाची अंमलबजावणी कितपत कडकपणे करते, याकडे मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










