टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि रतनचंद शहा सहकारी बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त आज सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी मंगळवेढा येथे विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. सुभाषराव शहा यांनी सहकार क्षेत्रात दिलेले भरीव योगदान आणि तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचे स्मरण करण्यासाठी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सोमवार सकाळी १०.०० वाजता रतनचंद शहा सहकारी बँकेच्या मुख्य हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन कार्यक्रम संपन्न होईल.
या कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सहकार महर्षी स्व. सुभाषराव शहा यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे विद्यमान चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












