मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
व्याजाने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे तब्बल सात लाख रुपये देऊनही मुद्दल व व्याजापोटी साडेपाच लाखांची बाकी दाखवून विधवा महिलेचे राहते घर खाली करण्यासाठी जेऊर येथील सावकार महिलांनी तगादा लावला आहे.
कर्जदार महिलेला दमदाटी, शिवीगाळ व धमकी दिली जात असल्याने तिने करमाळा पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.।
सुषमा विजय वनकळस यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी रुक्मिणी किसन माने, पूजा सागर माने, सागर किसन माने व पूनम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वनकळस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१९ मध्ये त्यांनी गावातील रुक्मिणी किसन माने यांच्याकडून दहा हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते.

यानंतर व्याज लावून त्यांनी फिर्यादी वनकळस यांच्याकडून आतापर्यंत ७ लाख रुपये घेतले, तसेच व्याजापोटी फिर्यादीचे जेऊर येथील राहते घर दि. ८ जुलै २०२० रोजी लिहून घेतले.ल
व्याजास हे घर जागा त्यांची सून पूजा सागर माने हिच्या नावे करून घेतली व फिर्यादीला परत सात टक्के दराने बेकायदेशीरपणे व्याज आकारून आतापर्यंत ५ लाख ५० हजार रुपये फिर्यादीकडे मुद्दल व व्याज राहिलेले असल्याचे सांगून
व्याजाचे पैसे दे नाही तर घर खाली कर, असे म्हणून फिर्यादीला व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून वारंवार घरी येऊन दमदाटी,

शिवीगाळ व धमकी दिली आहे, तसेच सागर माने याची बहीण पूनम हिने फिर्यादीकडून व्याजापोटी दीड लाख रुपये घेऊन घराचा व्यवहार मिटवण्याकरिता नोटरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













