टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सांगोला रोडवर काळा खडक शेजारी ‘हॉटेल महालोक फॅमिली रेस्टॉरंट’ उद्यापासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असून उद्या दुपारी 4 वा. उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती संचालक शुभांगी सूर्यवंशी यांनी दिली.

उज्जैन येथील योगी बंम बंम नाथ अघोरी आखाडा चक्रवर्ती प्रमुख सोमवरनाथ महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार समाधान आवताडे,

माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजीबापू पाटील सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रमुख प्रा.मारुती नवले, मराठी अभिनेत्री अलका कुबल या मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढणार आहे.

नव्याने सुरू होत असलेल्या ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंट हे वातानुकूलित असून ग्राहकांच्या सेवेसाठी उद्यापासून सुरू होत आहे. ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंट परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य आहे.

‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी,

मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास सूर्यवंशी परिवाराने व्यक्त केला.
आज मंगळवेढेरांनी ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
हॉटेल महालोक फॅमिली रेस्टॉरंटच्या संदर्भात अधिक माहितीसाठी 7070 52 6006 या नंबर वर संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












