मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे,

नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक होते.

दुखवट्यामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा विचार
या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार?
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यानुसार आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे.
प्रचाराची मुदत व मतमोजणीची वेळ
नवीन कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल. तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येईल.
निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















