मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे.
ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक अनुभवी व्यक्तींना महिला, एससी-एसटी आरक्षणामुळे निवडणूक लढवता येत नाही.

अशा अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी उपयोगी पडावा, या उद्देशाने ‘स्वीकृत सदस्य’ संकल्पना लागू करण्याची मागणी आहे.

संत दामाजी पुतळा परिसराची दर शनिवारी स्वच्छता
‘एक दिवस गावासाठी’ या सामाजिक उपक्रमांतर्गत मंगळवेढा शहरातील संत दामाजी पुतळा परिसराची दर शनिवारी नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील एखाद्या मंदिर किंवा सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्याचा संकल्प राबविण्यात येत आहे.

शनिवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत दामाजी चौकातील श्री संत दामाजी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. हा चौक शहरातील वर्दळीचा भाग असून, अवजड व हलक्या वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे येथे धुळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला तसेच पाण्याने पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमात मंगळवेढा शहरातील जागरूक नागरिक व विविध सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. वाढदिवसानिमित्त झाडांच्या कुंड्या भेट देऊन परिसराचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे.

संतभूमी असलेल्या मंगळवेढ्यातील सर्व संतांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे सांगत, या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत स्वप्नील फुगारे, अंबादास गुंगे, आण्णासाहेब देशमुख, स्वप्नील टेकाळे व सतीश दत्तू यांनी सहभाग घेतला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











