मंगळवेढा टाईम्स न्युज।
फलटण तालुक्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून एका तरुणाचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आला.
तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिचा पती आणि दोन प्रियकरांचा सहभाग उघडकीस आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मौजे सोमंथळी गावातील सागर दादासो दडस यांनी 21 जानेवारी ला आपला भाऊ सतीश उर्फ आप्पा दादासो दडस याची हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

विडणी परिसरात शोध घेऊन ही सतीशचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान सागर यांना त्याच्या मालकाकडून धक्कादायक माहिती मिळाली.

लखन बुधावले याचा फोन आला असून सतीश उर्फ आप्पा दडस याला लखन बंडू बुधावले आणि सतीश तुकाराम माने यांनी बेदम मारहाण केली आहे,याची माहिती त्याने पोलिसांना दिली असता पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील मौजे सोमंथळी येथील सतीश ऊर्फ आप्पा दडस याचे 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते.

या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात आणण्यात आले. मात्र, पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निर्घृण मारहाण करण्यात आली.
साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी
या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केला.

मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात, मुंडके व पाय निरा नदीत फेकून देण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला, अशी कबुली संशयितांनी दिल्याची माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली.
या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे. अनैतिक प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून माणुसकीला काळिंबा फसणारी घटना घडली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याची माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











