मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून अनेक घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

शिंदे यांनी भाजपकडे मुंबईत अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याचं बोललं जातंय. याचदरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजकारणात भूकंप घडणारा दावा केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘येत्या आठ दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे उलटफेर होतील’, असं नाना पटोले म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

मुंबईत सुरू असलेल्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “आम्ही मागेच म्हटलं होत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करेल. अजून खूप घडामोडी घडतील.

सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. मुंबईत भाजपाचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कोणाचंही ऐकलं जाणार नाही असे आदेश दिल्लीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना दिले जात आहेत. दरम्यान अशा बातम्या चालू असून त्या आपण पाहत आहोत, पण अजून मोठे गेम होणार आहेत”, असे नाना पटोले म्हणालेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार. महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं.

मग लोक बरोबर करतील, असेही असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केलाय.
पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती. आता ही मालकी कुणाकडे गेली? तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही तसेच आहे. त्यामुळे भाजपा काय करणार होतं? हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे अजून आणखी खेळ समोर आहे, काही दिवस थांबा असं पटोले म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












