मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यामध्ये नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका निवडणुका पार पडलेले आहेत. त्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्ज भरण्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

या निवडणुकांमध्ये ज्या गटाची निवडणूक आहे त्याच गटातील उमेदवार निवडून त्या भागाचा विकास साधावा असे मत दत्तात्रय बेदरे यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की सन २०१७ नंतर म्हणजे नऊ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका होत आहेत. या दोन्ही एकत्र निवडणुका असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या त्या प्रभागातील उमेदवारच त्यांच्या भागाला न्याय देऊ शकतो.
शिवाय ज्या प्रवर्गाची जागा आहे त्याच प्रवर्गातील उमेदवार निवडला गेल्यास सामाजिक विषमता कमी होण्यास मदत होणार आहे.

नगरपालिका व त्यानंतर महानगरपालिका निवडणुका पार पडलेले आहेत. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका म्हणजे ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पक्षात, वेगवेगळ्या संघटनेत तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते.
परंतु सर्वच राजकीय पक्षांमध्ये निष्ठावंतांना डावलून अचानक जवळच्या माणसांना तसेच नातेवाईकांना किंवा घरातील माणसांनाच उमेदवारी दिली जाते.

कायम जनतेसाठी काम करणारे, जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे कार्यकर्ते यातून दुखावले जातात व त्यांना काम करण्याची संधी दिली जात नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रमुख प्रश्न आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी इत्यादी समस्या सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये गटातील उमेदवारालाच उमेदवारी द्यावी व ज्या प्रवर्गासाठी जागा आहेत त्याच प्रवर्गातील उमेदवाराला संधी द्यावी असे मत सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेदरे आणि नियुक्त केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










