टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेचे संस्थापक चेअरमन स्व. रतनचंद शाह यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यंत्र हार्वेस्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने

‘नवे पाऊल, नवा आत्मविश्वास मंगळवेढा’ या सामाजिक उक्रमांतर्गत मोफत ३०० कृत्रिम अवयव (जयपूर फूट) अंगरोपण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अरमन राहुल शहा यांनी दिली.

या शिबिरात सुमारे तीनशे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून दिले जाणार असून, मोजणी प्रक्रिया ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. मोजमापानंतर लाभार्थ्यांना दि.४ फेब्रुवारी रोजी कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात येणार आहे.

हे शिबीर श्री संत दामाजी महाविद्यालय येथील सभागृहात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन उद्योगपती अजित रतनचंद शहा व लता अजित शहा यांच्या प्रेरणेने व

प्रकल्प अध्यक्ष सूर्यकांत शहा व प्रकल्प प्रमुख रामेश्वर मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम साकारला जात आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या पदाधिकारी संजना झंवर, रजनी अंबादे, आशा मणियार यांचे योगदान लाभणार आहे. महाराष्ट्रातील जयपूर फूटचे प्रणेते स्व. एमजेएफ हसमुखभाई मेहता यांच्या प्रेरणेतून तसेच डॉ. अस्मिता सुराणा यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम साकारत आहे.

या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा नवा आत्मविश्वास मिळणार असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहिती व नोंदणी साठी संपर्क :
📞 लायन डॉ अस्मिता सुराणा
98220 37205
📞 लायन आर्किटेक्ट रामेश्वर मणियार
8698951888
आर. एम. पवार – 9665226615

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










