मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर महापालिकेचेही निकाल हाती आले असून सोलापूर महापालिकेत भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग 2 कडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
कारण, मनसेचे युवा नेते बाळासाहेबसरवदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील प्रभागात भाजपकडूनशालन शिंदे उमेदवार होत्या,

येथील प्रभागात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग 2 मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले असून किरण देशमुख यांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रभाग 2 मध्ये सर्वांचे लक्ष लागले होते. येथून किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेनेचे गणेश कुलकर्णीयांच्यात थेट लढत होती.

विशेष म्हणजे याच प्रभागातील प्रभाग 2 क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत असून येथील प्रभागातच मनसेच्या बाळासाहेबसरवदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, प्रभाग 2 मधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील प्रभाग 2 मध्ये भाजपचे 4 ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथे हत्याप्रकरणाचा कुठलाही भावनिक परिणान झाला नसल्याचे दिसून येते.

शालन शिंदे 4 हजार मतांनी विजयी
आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, कल्पना कारभारी, नारायण बनसोडे आणि हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्या उमेदवार शालन शिंदे विजयी झाल्या आहेत. प्रभाग दोनमधील उमेदवारी माघार घेण्यावरून मनसेचे युवा नेते बाळासाहेबसरवदे यांची हत्या झाली होती.

येथील प्रभागातील विजयी उमेदवारांची अधिकृत आकडेवारी यायची आहे, मात्र सुमारे 4 हजार मतांनी शालन शिंदे विजयी झाल्याचे सांगण्यात येते. तर, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख सुमारे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
मनसेचे उद्विग्न प्रतिक्रिया
लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधआनाची हत्या आहे. मुळात येथे खून झालेलाच होता, उमेदवार पहिल्या दिवसापासून तुरुंगात आहे. तरीही पहिल्या फेरीपासून लीडवर आहे, 4 हजारांच्या फरकाने उमेदवार निवडून येतो.

सत्ता आणि पैशांच्या जोरावर ही निवडणूक लढली गेलीय, एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर देखील तुरुंगात होणारा उमेदवार विजयी होत असेल तर समाजाने मतदार म्हणून आपण याचा विचार करावा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सोलापुरातील मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी दिली आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग 2 क मध्ये भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्या विजयानंतर मनसे पदाधिकारी उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










