मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयागाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा केली. ५ फेब्रुवारीला मतमोजणी होणार तर ७ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या हद्दीत आचारसंहिता लागू झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून आजपासून कामाला सुरूवात केली जाईल.

सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला होता. पण राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांसाठीचा कालावाधी वाढवून देण्यात यावा यासाठी अर्ज केला होता.

त्यावर सुनावणी करत सोमवारी सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली.

राज्य निवडणूक आयोगाने ज्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक जाहीर केली आहे त्यामध्ये ५० टक्क्यांमध्ये आरक्षण आहे.

लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्याचसोबत १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका देखील होणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे वेळापत्रक –
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी – १६ जानेवारी ते २१ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
नामनिर्देशनपत्रांची छाननी – २२ जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी
मतदान – ५ फेब्रुवारी (सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
मतमोजणी – ७ फेब्रुवारी २०२६

१२ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी निवडणुका होतील.
मतदाराला दोन मते देता येणार
प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतील. १ मत जिल्हा परिषद आणि १ मत पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाइन प्रक्रिया राहणार असून महापालिका सारखीच होणार आहे. ज्या जागा राखीव आहेत. त्या जागेवर जातवैधता पडताळणी आवश्यक असणार आहे.
जातप्रमाणपत्र- उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्याची आवश्यकता असणार आहे. जातप्रमाणपत्र नसेल तर जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर ६ महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असणार आहे. जर नाही केलं, तर त्याची निवड रद्द होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









