मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ९ जानेवारीपासून राज्यातील विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित

शाळांसाठी ऑनलाइन शाळा नोंदणी (स्कूल रजिस्ट्रेशन) व शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत तसेच

स्थलांतरित शाळांचा आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबत काही त्रुटी आढळल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्यावर निश्चित करण्यात येणार आहे.

शाळेची मान्यता ज्या मंडळाची आहे, त्याच मंडळाची निवड नोंदणी दरम्यान करण्यात आली आहे का, याची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य मंडळाची मान्यता असलेल्या शाळेने केंद्रीय मंडळ निवडल्यास ती गंभीर चूक मानली जाणार आहे. त्यामुळे ९ ते १९ जानेवारी या कालावधीत शाळा नोंदणी व व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












