मंगळवेढा टाईम्स न्युज।
बापाने पोटच्या सात वर्षाच्या जुळ्या चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून देऊन दोघांचा जीव घेतल्याचा दुर्दैवी प्रकार शनिवारी सकाळी घडला. या घटनेने केत्तूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी व वीज कंपनीत ऑपरेटर म्हणून कर्मचारी असलेले सुहास ज्ञानदेव जाधव (वय ३२) याने घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून रागाच्या भरात पोटच्या शिवांश व श्रेया या दोन चिमुकल्या मुलांना हिंगणी (ता. करमाळा) येथील शेतात नेले व तेथेच त्यांना विहिरीत ढकलून दिले.

त्यानंतर सुहास यांनीच काही वेळाने स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील सर्वजण विहिरीकडे धावत आले. मात्र, तोपर्यंत दोनही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात बुडून मृत्यू झालेली जुळी बहीण-भाऊ आहेत. या प्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुहासने आपल्या जुळ्या मुलांना कोणत्या कारणामुळे मारले याप्रकरणी पोलिस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.
..अन् त्याने विष घेतले
संशयित सुहास याने मुलांना विहीरीत ढकलून देत हत्या केल्यानंतर पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन केले.

पोलिसांनी त्याला ताब्यात 3 घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












