सोलापुर : तानाजी गोरड
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस सायरा शेख यांनी राजीनामा दिल्याने सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सायरा शेख ह्या गेली वीस वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोलापुरातील सर्वात कार्यशील महिला पदाधिकारी होत्या. राज्यातील बहुतांश मोठ्या आंदोलनात त्या पुढे होत्या परिणामी पक्षासाठी त्या एक मोठी ताकद होत्या.

सोलापुरासह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी सायरा शेख यांच मोठं योगदान आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत फुट पडल्यानंतर ही अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यानीं घेतला होता.

महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेत्यानीं आपल्याला डावलल्याचा ठपका राजीनामा पत्रात ठेवण्यात आला आहे.

सायरा शेख यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांची रांग त्यांच्या निवासस्थानी होती. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन त्यांनी भाजपच्या उमेदवारानां पाठिंबा दर्शवला आहे.

एेन निवडणूकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाला राजीनामा देऊन भाजप उमेदवारांना त्या पाठींबा देत आहेत ह्यामुळे सोलापुरात राष्ट्रीवादी काँग्रेस (अप) ला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











